आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी दूध संघांकडून शेतकऱ्यांची लूट, दूध खरेदीचा दर या वर्षातील निच्चांकी पातळीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - खासगी दूध संस्थांनी आपले दूध खरेदीचे दर थेट २० रुपयांवर आणले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे खरेदीचे दर घटवताना ग्राहकांना मात्र हेच दूध ते ४० ते ४४ रुपये प्रतिलिटर दराने विकत आहेत. दुधाच्या पावडरचे दर कमी झाल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. मात्र, या मागे शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना ग्राहकांना लुटण्याचा त्यांचा उद्देश उघड झाला आहे. 

 

सध्या दुधाच्या पावडरचे दर १८० रुपयांवरून १२० रुपयांवर आल्याचे कारण खासगी दूध संस्थांनी दर घटवण्यासाठी पुढे केले आहे. मुळात यातील बहुतांशी खासगी दूध संघ दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादने तयार करतात, तरीही त्यांनी खरेदीचे दर घटवले आहेत. मात्र, ते विक्री करत असलेल्या दूध किंवा दुधाच्या इतर पदार्थांच्या विक्री दरात मात्र कोणतीही कपात केलेली नाही. 

 

दुधाच्या बाजारपेठेवर खासगी दूध संस्थांचे वर्चस्व आहे. कारण शेतकऱ्यांच्या दुधाची प्रामुख्याने खरेदी खासगी दूध संस्थांकडूनच होते. काही सहकारी दूध खासगी संस्थांना दूध विकतात. त्यांच्याकडूनही खासगी दूध संघ अतिशय कमी दरात दुधाची खरेदी करत आहेत. 
मध्यंतरी शेतकऱ्यांच्या संपामुळे नमून राज्य सरकारने दूध दरात तीन रुपये दरवाढ केल्याचा डंका पिटला. त्यावेळी जिल्ह्यातील खासगी दूध संघ आधीच शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रुपये दर देत होते. सहकारी दूध संघही २६ ते २६ रुपये ५० पैसे असे दर देत होते. त्यामुळे सरकारने केलेल्या दरवाढीचा जिल्ह्यातील दूध उत्पादकांना त्याचा फारसा लाभ झालेला नाही. त्यानंतर जुलै महिन्यापासून खासगी दूध संस्थांनी सातत्याने दुधाच्या खरेदी दरात कपात करत तो २० रुपयांवर आणून ठेवला आहे. शेतकऱ्यांना हाही दर मिळत नाही. कारण सरकारच्या ८.५ एसएनएफची (सॉलिड नॉट फॅट) अट ८० टक्के दूध पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे या दरात आणखी दीड ते दोन रुपयांची कपात करून शेतकऱ्यांच्या पदरी प्रतिलिटर फक्त साडे १८ ते २० रुपये पडत आहेत. त्यामुळे या संकटात गायी सांभाळण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. 

 

राज्यात नगर जिल्हा दूध उत्पादनात आघाडीवर आहे. किंबहुना जिल्ह्याला लागून असलेल्या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असताना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दूध धंद्यानेच तारले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण खूप कमी आहे. पण, गेल्या २०१२ ते १०१५ या चार वर्षांत सातत्याने पडलेल्या दुष्काळाची, तसेच सरकारच्या धरसोड वृत्तीची झळ मोठ्या प्रमाणात दूध धंद्याला बसली. त्यामुळे २०१४ ते २०१५ या एका वर्षात एकट्या नगर जिल्ह्यात दूधसंकलनात १० लाखांची घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रोजचे दूध संकलन २८ वरून १८ लाखांवर आले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील दूध उत्पादक गायींची विक्री केली. त्यामुळे पशुधनाची मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मध्यंतरी दुधाचे खरेदी दर २७ रुपये झाल्यानंतर दूध धंद्याला चांगले दिवस आले, असे शेतकऱ्यांना वाटले होते, पण आता भ्रमनिरास झाला आहे. 


गेल्या वर्षभरात खाद्याचे दर ५० टक्क्यांनी वाढले. दूध धंदा टिकण्यासाठी गायीच्या दुधाचा खरेदी दर किमान ३२ रुपये करण्याची मागणी, अशी मागणी स्वाभिमानी दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव डेरे सातत्याने करत आहेत. मात्र, आता विपरित स्थिती सरकारने आणली आहे. 

 

उत्पादकता वाढवणे आवश्यक 
शेतकऱ्यांना दूध धंद्यात फायदा मिळण्यासाठी गायींची उत्पादकता वाढवणे आवश्यक असल्याचे मत पुण्याच्या एका प्रसिद्ध खासगी दूध संघाच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केले. सध्या राज्यातील संकरित गायी सरासरी १२ लिटर दूध देतात. सध्याच्या खर्चात चांगले व्यवस्थापन करून ही उत्पादकता वाढणे शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

 

दलालांनाच मलई 

गायी म्हशींच्या दुधाचा खरेदी दर अनुक्रमे २० ३१ रुपये आहे. दूधविक्रीचा दर मात्र अनुक्रमे ४५ ६० रुपये आहे. शेतकऱ्यांपेक्षा मधल्या लोकांना जास्त पैसे मिळणे, ही बाबच दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात सरकारला नेहमीच खूप वेळ लागतो, असा अनुभव नेहमीचा झाला आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात दूध उत्पादक आहेत. 

 

सरकारचे चुकीचे धोरण 
एकेकाळीदूध उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र धआता सातव्या क्रमांकावर घसरला आहे. केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. या उलट गुजरात कर्नाटक राज्यांत दूध धंदा अधिक वेगाने वाढत अाहे. महाराष्ट्राच्या बाजूच्या सर्व राज्यांत दुधाचा खरेदीदर ३० रुपयांच्या दरम्यान आहे. विशेषत: त्यात भाजपशासित राज्येही आहेत. ‌‌‌‌‌‌‌विशेष म्हणजे, गोवा कर्नाटक राज्यांत शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर रुपये अनुदान दिले जाते. 

 

सहकारी संघांचीही कपात 
खासगीदूध संस्थांबरोबरच सहकारी दूध संस्थांनी आपले दूध खरेदीचे दर दोन रुपयांनी घटवून ते २५ रुपये केले आहेत. त्यांनीही नुकसानीचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना जादा दर देणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. या परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था कसायाच्या ताब्यात मान सापडलेल्या जनावरासारखी झाल्याचे हताश प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने व्यक्त केली. 


पाणी दूध एकाच दरात 
पाण्याच्याबाटलीचा दर आहे २० रुपये. दर लिटरमागे गायीच्या दुधाचाही दर आता तितकाच झाला आहे. ४० रुपये प्रतिलिटर उत्पादन खर्च असलेल्या दुधाला अवघा २० रुपये दर मिळत आहे. सरकारने दूध उत्पादकांना पूर्ण वाऱ्यावर सोडले आहे. दुधाला दर नसल्याने जनावरे विकण्यास गेलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी बाजारातही निराशाच पडत आहे. कारण जनावरांचे दर निम्म्याने उतरले आहेत. शेतकऱ्यांना आधार देणारा हा धंदा युती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बंद पडण्याच्या स्थितीत आहे. 

बातम्या आणखी आहेत...