आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यातही लाख नागरिकांना टँकरचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - समाधानकारक पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल लाख ३९ हजार नागरिकांना टँकरच्या पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. उन्हाळ्यापेक्षाही सध्या जास्त पाणी टंचाई भासते आहे. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात लाख ७५ हजार नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. आता त्यात बरीच वाढ झाली आहे.
यंदा जानेवारीपासूनच जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली. प्रारंभी अवघे २० टँकर सुरू होते. फेब्रुवारीपासून टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत गेली. मार्च महिन्यात टँकरची संख्या दीडशेवर गेली. एप्रिलमध्ये ती ३०० झाली. मे महिन्यात टँकरची संख्या ३८० वर गेली. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. जून महिन्यात दहा-बारा दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जुलै महिना पावसाचा असतो.मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून पाऊस लांबल्याने टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत २० टँकर वाढले आहेत. बुधवार अखेरपर्यंत २८५ गावे हजार २६७ वाड्या-वस्त्यांना ३८५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. जिल्ह्यातील लाख ३९ हजार नागरिकांना सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पाऊस असल्यामुळे साधारण सर्वच टँकर बंद केले जातात. तथापि, यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे शासनाला तब्बल दोन वेळा दुष्काळी उपाययोजनांना मुदतवाढ द्यावी लागली आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ७९ टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात ६८ कर्जत तालुक्यात ५४ टॅँकर सुरू आहेत. कमी पावसामुळे ग्रामीण भागातून टँकरला मागणी वाढत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण ३८५ टँकरपैकी २२ शासकीय, तर ३६३ खासगी आहेत. शासकीय टँकर गळके असल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अकोले, श्रीरामपूर राहुरी तालुक्यात अद्यापि टँकर सुरू करावे लागलेले नाहीत.

टँकर
संगमनेर- २६
नेवासे - १६
कोपरगाव -
नगर - ३१
पाथर्डी - ७९
पारनेर - ६८
शेवगाव - ४२
कर्जत - ५४
जामखेड - ३७
श्रीगोंदे - १८

टँकरसाठी रस्ते नसतील, तर बैलगाडीने पाणी पुरवा...
ज्याभागात टँकर जाण्यासाठी रस्ते नाहीत, त्या भागात बैलगाड्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. टँकरचे प्रस्ताव प्रलंबित ठेवल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता बैलगाड्यांच्या शोधात आहे.
बातम्या आणखी आहेत...