आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम अल्पायुषी ठरेल - अशोक चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - एमआयएम पक्षाची निर्मिती काँग्रेसची व्हाेट बँक तोडण्यासाठीच भाजपने केली असली तरी, एमआयएम पक्ष भाजप-सेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने मुस्लिम बांधव अशा पक्षाबरोबर जाणार नाही. मुस्लिम लीगप्रमाणेच एमआयएम अल्पायुषी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच भाजप मिस कॉल पक्ष असून, सोनिया गांधी यांच्यावर टीका करणारे लाटेत निवडून येऊन मंत्री झाले. त्यांची बेजबाबदार वक्तव्ये ही वैचारिक दिवाळखोरीचे निदर्शक असल्याची परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डी येथे केली.
चव्हाण यांनी रविवारी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावली. त्यानंतर विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर कडाडून हल्ला चढविला.

विखे समर्थकांची झुंबड, तर थोरात समर्थकांची पाठ
प्रदेशाध्यक्षझाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी साईदर्शनासाठी प्रथमच हजेरी लावली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हेलीपॅड ते साईमंदिर मार्गावर खासदार चव्हाण यांचे जंगी स्वागत केले. माजी महसूलमंत्री रविवारी दिवसभर शिर्डीत होते तरीसुद्धा त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी चव्हाणांच्या दौ-याकडे पाठ फिरविली.