आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mini Marethon Won Ramesh Shirsath And Jaishree Gaikwad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिनी मॅरेथॉनमध्ये रमेश शिरसाठ व जयश्री गायकवाड प्रथम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये अंकुश गायकवाड याने प्रथम क्रमांक मिळवला. सलमान शेखला द्वितीय, तर रमेश शिरसाठला तृतीय क्रमांक मिळाला. मुलींमध्ये जयर्शी ल्युथर गायकवाड हिने प्रथम, कल्याणी कवडे हिने द्वितीय व प्रिया मोरे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

सकाळी 9 वाजता रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या मैदानावर शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर व न्यू आर्टस् कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. या स्पर्धेत अहमदनगर कॉलेज, पेमराज सारडा कॉलेज, न्यू आर्टस् कॉलेज, दादासाहेब रूपवते ज्युनिअर कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, आयुर्वेद महाविद्यालय, इतर महाविद्यालयांतील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.