आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यल्प दरात मिळणार कुंभमेळा पर्वणीचा लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीला सुरुवात झाली अाहे. बारा वर्षांनी येणाऱ्या या पर्वणीचा जिल्ह्यातील भाविकांना अत्यल्प दरात लाभ घेण्याची सुविधा पहिल्यांदाच मिळत आहे. सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नान अमृत महोत्सव सहयोगी समितीची माध्यमातून जिल्ह्यातील भाविकांना पर्वणीचा लाभ घेण्याची सुविधा अवघ्या ७०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ आॅगस्टपासून ३०० भाविकांचे जथ्थे समितीच्या माध्यमातून कुंभमेळ्यात सहभागी होतील. दीड महिना चालणाऱ्या पर्वणीत हजारो भाविकांना समितीच्या माध्यमातून पर्वणीचा लाभ घेता येईल.
देशभरातून कोट्यवधी भाविक पवित्र स्नानाकरिता नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये येतात. २९ ऑगस्ट, १३, १८ २५ सप्टेंबर रोजी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे शाहीस्नानाचा विशेष पुण्यकाल आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सर्वात मोठा प्रसिद्ध आखाडा म्हणून ओळख असलेल्या श्रीपंचायत बडा उदासीन आखाडा यांच्या एकर प्रशस्त जागेवर कुंभमेळ्यानिमित्त भाविकांची सोय केली जाते. आखाड्याच्या विनंतीवरून नगरमध्ये भाविकांची त्र्यंबकेश्वर येथे निवास, भोजन धार्मिक विधीची सोय करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून अवघ्या ७०० रुपयांत भाविकांना दोन दिवस निवास, भोजन धार्मिक विधीची सुविधा आखाड्याच्या जागेत मिळणार आहे, तर प्रवासाचा खर्च भाविकांना करावयाचा आहे.

भाविकांची गर्दी, महागाई, लुटले जाण्याची शक्यता, असुविधा अशा विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाविकांना समितीच्या माध्यमातून पर्वणीचा लाभ घेणे अधिक सोईस्कर होणार आहे. शाहीस्नानाच्या पर्वणीच्या दिवसांव्यतिरिक्तही भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे पवित्र स्नानासाठी जाता येणार आहे.

समितीच्या कार्यालयात नावनोंदणी केलेल्या भाविकांना १५ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत पर्वणीचा लाभ घेण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. नियोजनानुसार नगरहून एकावेळी जवळपास ३०० भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे शाहीस्नानाकरिता पाठवण्यात येईल. भाविकांना नियम अटी असलेले माहितीपत्रक प्रवेश पास देण्यात येणार आहे. हा पास अहस्तांतरणीय असून ज्या भाविकांनी नोंद केली आहे, त्यालाच स्वखर्चाने त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नानाकरिता जाता येणार आहे.

कुुंभमेळ्यादरम्यान शाही स्नानाबरोबरच श्रीपंचायत बडा उदासीन आखाड्याच्या वतीने दररोज पहटे ते दरम्यान काकड आरती, सकाळी ते ११ दरम्यान शिवलिंग पार्थिव रुद्राभिषेक, महाआरती, महाप्रसाद, भंडारा तसेच दुपारी ते दरम्यान शिवपुराण कथा, महाआरती तसेच सायंकाळी भव्य रासक्रीडेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

भाविकांनी नावनोंदणीसाठी कुंभमेळा सहयोगी समितीच्या मुख्य कार्यालयात ०२४१-२३४५८१०, केडगाव कार्यालयाशी २५५०१६१, सावेडी कार्यालयात २४२४७९७, भिंगारसाठी ८८०५०५१९९९, नागापूरसाठी २७७७०४८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन समितीचे वसंत लोढा यांनी केले आहे.

समितीच्या माध्यमातून १५ आॅगस्टपासून भािवकांचे जथ्थे त्र्यंबकेश्वरकडे रवाना होणार आहेत. नोंदणी करणाऱ्या सर्वच भािवकांना दीड महिन्याच्या कालावधीत पर्वणीचा लाभ घेण्याची सुविधा समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आखाड्यातील पाच एकर जागेवर िनवास भोजनाची सुविधा सध्या उभारण्यात आलेली आहे. केवळ िनवास भोजनच नव्हे, तर भाविकांचे धार्मिक विधी विधिवत पार पडावेत, यासाठी समिती प्रयत्नशील आहे.

आतापर्यंत १००० भाविकांची नोंदणी
सिंहस्थकुंभमेळा शाहीस्नानाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात गेल्या दीड महिन्यापासून सहयोगी समितीच्या कामाला सुरुवात झाली. सुविधांबाबत जनजागृती करून समितीने पर्वणीचा लाभ घेण्याबाबत पहिल्यांदाच मिळत असलेल्या सुविधांची माहिती भाविकांपर्यंत पोहोचवली. यातून आतापर्यंत शहरात एक हजार भाविकांनी पर्वणीचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे. पर्वणीचा कालावधी जवळ येईल, त्या प्रमाणात भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.