आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Pankaja Munde Worship Shanidev In Pathardi

चौथऱ्यावरून मंत्री पंकजा मुंडे यांचे शनिदर्शन, पाथर्डीत केला अभिषेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी येथील नाथनगर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तेल वाहून दर्शन घेतले. छाया: संजीव कुटे. - Divya Marathi
पाथर्डी येथील नाथनगर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तेल वाहून दर्शन घेतले. छाया: संजीव कुटे.
पाथर्डी - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पाथर्डी तालुक्यातून अचानक दौरा करून शनिवारच्या मुहूर्तावर शनिदेवाचे चौथऱ्यावर चढून दर्शन घेतले. शनिला तेल वाहून राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे, बळीराजाला सुखी होऊ दे, अशी प्रार्थना केली.
पंकजा मुंडे यांचा दौरा बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव येथे होता. भगवानगडाच्या पायथ्याला हे गाव आहे. तेथील कार्यक्रम आटोपून त्यांना आष्टी तालुक्यातील पाण्याचे धामणगाव येथे जायचे होते. शिरूरमार्गे खराब रस्ता असल्याने राष्ट्रीय महामार्गावरून पाथर्डीमार्गे रस्ता चांगला असल्याने या रस्त्याने जाण्याचा ऐनवेळी निर्णय झाला.
प्रवासादरम्यान त्यांनी खरवंडी कासार येथे डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांच्या घरी भेट दिली. खरवंडीकरांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. मुंडे यांचे कट्टर समर्थक, अॅड. विक्रम डोंगरे यांच्या निधनानंतर पाथर्डीत त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पंकजा या डोंगरे कुटुंबीयांकडे पोहोचल्या. त्यांच्या समवेत आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार दगडू बडे, राहुल कारखेले, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. डोंगरे यांच्या घरापुढे जागृत असे शनिमंदिर आहे. शनीचे मंदिर पाहून त्या दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे वळल्या. चौथऱ्यावर चढून शनिच्या मूर्तीवर तेल टाकले. शनिवार असल्याने त्यांनी विशेष मनोभावे दर्शन घेतले.
पुढे वाचा... दुष्काळ हटू दे, बळीराजा सुखी होऊ दे