आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Parrikar, Today's Settle Question O Fort

संरक्षणमंत्री पर्रिकर आज किल्ल्याचा प्रश्न सोडवणार का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर अवघ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेला राष्ट्रीय नेत्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरच्या भुईकोट किल्ल्याचे जतन संवर्धनाचे काम संरक्षण मंत्रालय राज्य सरकार यांच्यात होणाऱ्या सामंजस्य कराराअभावी रखडले आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गुरूवारी (१९ नोव्हेंबर) होणाऱ्या नगर भेटीत हा प्रश्न मार्गी लागावा, अशी नगरकरांची अपेक्षा आहे.

सुलताना चांदबिबीने प्राणाची पर्वा करता ज्या किल्ल्याचे रक्षण केले, करवीरनिवासी चौथे शिवाजी महाराजांनी स्वाभिमानासाठी जिथे हौतात्म्य पत्करले, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासारख्या १२ राष्ट्रीय नेत्यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात जिथे सर्वात दीर्घ कारावास भोगला त्या भुईकोट किल्ल्याचे जतन, संवर्धनाचे काम केवळ संरक्षण मंत्र्यांच्या
स्वाक्षरीसाठी रखडले आहे. मागील पाच वर्षांपासून काम बंद पडल्याने झालेला खर्चही वाया गेला आहे.
हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. किल्ला लष्कराच्याच ताब्यात ठेवून त्याला राष्ट्रीय स्मारक जागतिक पर्यटन केंद्राचा दर्जा दिल्यास नगर शहराच्या विकासाला मोठी मदत होऊ शकेल. नरेंद्र मोदींचे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सरदार पटेलांची स्मृती जपणारे ग्रंथालय किंवा एखादे संग्रहालय किल्ल्यात उभारले जाईल, अशी नगरकरांची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली.

किल्ल्यातील एक-दोन वगळता अन्य सर्व कार्यालये लष्कराने अन्यत्र हलवली आहेत. राहिलेली कार्यालयेही लवकरच नव्या इमारतीत स्थलांतरित होतील. सामंजस्य करार झाला नाही, तर लवकरच किल्ल्याला कुलूप लागलेले पहायला मिळेल. त्यामुळे संरक्षण मंत्री पर्रिकर यांनी यात तातडीने लक्ष घालावे, अशी नगरकरांची इच्छा आहे. संरक्षण मंत्री गुरूवारी सकाळी व्हीआरडीईला भेट देणार आहेत. पुढे ते नाशिकला रवाना होतील. नगरचे खासदार दिलीप गांधी अन्य लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेतल्यास किल्ल्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल.

नगरचा ऐ्तिहािसक भुईकोट किल्ला संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कृपादृष्टीच्या प्रतीक्षेत आहे...