आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; युवकाला सक्तमजुरीची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी संदीप उर्फ संदेश दिवाणजी चांदणे (२३,देवळाली प्रवरा) याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. सावंत वाघुले यांनी मंगळवारी मंगळवारी हा निकाल दिला. देवळाली प्रवरा येथील एका १३ वर्षाच्या शाळकरी मुलीवर तिच्या घराच्या अंगणात येऊन आरोपीने विनयभंग केला होता.

अत्याचारित मुलीच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा प्रकार १० सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी तीन वाजता घडला होता. राहुरी पोलीस ठाण्यातील हवालदार बी. आर. लांडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून नगरच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सुरेश लगड यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासले.
यामध्ये अल्पवयीन मुलगी, तिची आई चुलते, तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
वयाच्या दाखल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी साक्ष दिली. या खटल्यात फिर्यादीच फितूर झाला होता. मात्र तपासी अधिकारी यांनी न्यायालयात मुलीची बाजू लढविली. खटल्यातील साक्षीपुरावा आणि अॅड. लगड यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष न्यायालयाने आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग (कलम ३५४) केल्याप्रकरणी आरोपीस वर्षे शिक्षा आणि हजार रुपये दंड दंड भरल्यास महिने शिक्षा ठोठावण्यात आली.
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा-२०१२ चे कलम अन्वये आरोपीस वर्षे सक्तमजुरी आणि हजार रुपये दंड, तर दंड जमा केल्यास महिने साधी शिक्षा अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. दोन्ही कलमांन्वये झालेल्या शिक्षेत एकूण १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातील हजार रुपये पीडित मुलीला तिच्या आईमार्फत द्यावेत, असेही आदेश न्यायालयाने निकालात दिले आहेत.