आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा तळवडीत विनयभंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - तळवडी येथील १५ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याबद्दल तिघांविरूद्ध सोमवारी (१२ सप्टेंबर) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये केंद्रीय राखीव दलातील (सीआरपीएफ) एका जवानाचा समावेश आहे. यापूर्वी याच भागातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार खून प्रकरण भांबोरा येथे मुलीवर अत्याचाराच्या प्रयत्नाची घटना घडली होती. पीडित मुलगी दुपारी शाळेतून घरी आली असता मनोज म्हस्के, पंकज खोडवे आणि एक अनोळखी व्यक्ती असे तिघे जण मोटारसायकलीवरून तिच्या घरी आले. मनोज पंकज मुलीच्या घरात शिरले. मनोजने मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे घाबरलेली मुलगी घराबाहेर पळाली. तिची आई घराशेजारी जनावरांना चारा टाकत होती. मुलीचा आवाज ऐकून ती पळत आली. मुलीच्या आईला पाहून तिघेजण पळून जाऊ लागले. आईने मनोजला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते पळून गेले. नंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनोज हा केंद्रीय राखीव दलात आहे. तपास उपनिरीक्षक व्ही. डी. महांगरे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...