आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेरमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खून प्रकरण: 3 जण दोषी, उद्या शिक्षा सुनावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी तीन जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने 2014 सालच्या या प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

अहमदनगरला पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या तिघांवरही बलात्कार आणि खूनासह सहा आरोप ठेवण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

22 ऑगस्ट 2014 साली लोणी मावळा गावात मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला होता. पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यावर घरी येताना अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला होता.

या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. आरोपींना दोषी ठरवल्यानंतर अण्णा हजारे यांनी फोनवरुन निकम यांचे अभिनंदन केले आहे.

पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...