आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार करून मुलीच्या वडिलांना मारहाण करण्याची घटना तालुक्यातील डोंगरवाडी, काताळवेढा येथे घडली. अत्याचार सहन झाल्याने पीडित मुलीने तणनाशक पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तातडीने उपचार करण्यात आल्याने ती त्यातून बचावली.

बुधवारी दुपारी तीन वाजता एक शाळकरी मुलगी शाळेतील विज्ञानाचा पेपर देऊन घरी परतली असता तिच्या घरी कोणीही नव्हते. घरात शाळेचे कपडे बदलत असताना अमोल भाऊ डोंगरे याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. अत्याचार सुरू असताना पीडित मुलीचा आरडाओरडा सुरू होता. ते ऐकून मुलीचा चुलता तेथे धावत आला. चुलत्याने घरातील प्रकार पाहून त्याने मुलीच्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता अमोल याने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून फेकून दिला. तुला जगायचे असेल तर येथून निघून जा' अशी धमकी देत त्याने चुलत्यास घराबाहेर ढकलून दिले. घराची कडी लावून घेतली. त्यानंतर नराधम अमोल याने पीडित मुलीवर पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून निघून गेला.
अत्याचार असह्य झाल्याने पीडित मुलीने घरात असलेले तणनाशक औषध पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत मुलीचे आई-वडील तसेच इतर नातेवाईक घरी पोहचले. पीडित मुलीस तातडीने पुणे जिल्ह्यातील आणे येथे दाखल करण्यात येऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. मुलीवर उपचार सुरू करण्यात आल्यानंतर तिचे वडील अमोल यास समजावण्यासाठी गेले असता त्यांनाही अमोल याने दमदाटी, तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर तो तेथून फरार झाला. शनिवारी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी अमोल भाऊ डोंगरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पुढे वाचा... बोटा खूनप्रकरणी संशयित ताब्यात
बातम्या आणखी आहेत...