आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुंभोडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - रुंभोडी शिवारात शेताच्या कडेला एका दहा वर्षांच्या आदिवासी मुलीवर शिवाजी सखाराम मधे (चिचोंडी, हल्ली मुक्काम रुंभोडी) याने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजता नदीपात्राच्या शेजारी उसाच्या शेतालगत शौचास गेली होती. ती परत येत असताना मधे याने तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलीच्या बहिणीने हा प्रकार पाहिला. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी मधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप जगताप, हेड कॉन्स्टेबल सुदाम फटांगरे, शिवाजी भांगरे या घटनेचा तपास करत आहेत.