आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघा आरोपींना पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - तेरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वडझिरे येथील दोघा नराधमांना पारनेर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मुलीवर अत्याचार करणारांमध्ये मुलीच्या चुलत चुलत्यासह एका तरुणाचा समावेश आहे.
काही महिन्यांपासून बाळू गंगाराम वराळ (३७, वडझिरे) हा मुलीवर अत्याचार करीत होता. त्याचे हे कृत्य सुभाष बाबुराव चौधरी याने पाहिल्यानंतर त्याने आपल्या मोबाइलमध्ये त्याचे चित्रिकरण केले. ते पीडित मुलीला दाखवून तिच्या आई-वडिलांना ते दाखवण्याची त्याने धमकी देत त्यानेही अत्याचार केला. त्यानंतर दोघेही नराधम मुलीवर अत्याचार करीतच होते. काही दिवसांनंतर मुलीला त्रास जाणवू लागल्यानंतर तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष पोपट शेटे यांनी घटनास्थळी जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. मुलीने झालेला अत्याचार पोलिसांपुढे कथन केला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बाळू वराळ सुभाष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...