श्रीरामपूर - किरकोळ घरगुती वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता नायगाव येथे घडली. वर्षा प्रदीप राशिनकर (२२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्रदीप बाबासाहेब राशिनकर (२५) याचे पत्नी वर्षाशी पटत नव्हते. दोघांत नेहमी वाद व्हायचे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात वाद झाले. यावेळी प्रदीपने कुऱ्हाडीने वर्षाच्या मानेवर सपासप वार केले. त्याच तिचा जागीच मृत्यू झाला. त्याचे चुलते अरुण किसन राशिनकर यांनी याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदवून प्रदीपला अटक करण्यात आली.
सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर तुरनर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. मंगळवारी दुपारी शवविच्छेदन करून वर्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नायगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षाला दोन लहान मुले आहेत.