आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mirajgaon Group Jilha Parishad, Panchayat Samiti Election

मिरजगाव गटातून अनभुले यांचा अर्ज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मिरजगाव गटातून काकासाहेब तापकीर यांनी शुक्रवारी उमेदवारी दाखल केली. त्यांच्यासह शिवाजी अनभुले यांनीही अर्ज दाखल केला. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी सात, तर पंचायत समितीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. राशीन गटातून सुरेखा राजेभोसले, निर्मला मोढळे, सुवर्णा कानगुडे यांनी अर्ज भरले, तर बारडगाव सुद्रिक गटातून मंगल कोपनर यांनी अर्ज दाखल केला. पंचायत समितीसाठी मिरजगाव गणातून पंढरीनाथ गोरे, महेंद्र चेडे, संजय जंजिरे व प्रकाश चेडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय बानुबाई जोगदंड (थेरगाव), मंगल राऊत, संजय शेटे, प्रकाश कदम, राम शेटे, नवनाथ शिंदे, भानुदाय हाके (चापडगाव), स्वाती सुद्रिक, सुवर्णा नलगे (बारडगाव सुद्रिक), शोभा घालमे (कुळधरण), देविदास देशमुख, शाहू राजेभोसले, संग्राम पाटील, राम कानगुडे (राशीन), निता रणदिवे (भांबोरा) आदींनी उमेदवारी दाखल केली.