आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयआरसी ही भविष्यातील रेजिमेंट, ब्रिगेडिअर व्ही. एस, वर्मा यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ‘‘मेकॅनाईज्डइन्फन्ट्री ही विशेष रेजिमेंट आहे. पूर्वी युद्धात चिलखती दल पायदळापेक्षा पुढे निघून जात असे. त्यामुळे मेकॅनाईज्ड रेजिमेंटची निर्मिती करण्यात आली. नगरची एमआयआरसी एक विशिष्ट लष्करी प्रशिक्षण संस्था आहे. येथे साध्या तरुणाचे रूपांतर एका सुसज्ज तांत्रिकदृष्ट्या सक्षम सैनिकात केले जाते. ही एक भविष्यातली रेजिमेंट आहे,” अशी माहिती नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. एस. वर्मा यांनी दिली.

भारताच्या पाकिस्तानवरील १९६५ मधील युद्धातील विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “दोन एप्रिल १९७९ रोजी एमआयआरसीची स्थापना झाली. त्यासाठी पायदळाच्या १४ बटालियन यांत्रिकीकरणासाठी निवडण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचे कोठेही युद्ध असले, तरी शत्रूला भारी पडणारा सैनिक येथे घडवला जातो. याशिवाय त्याला विशेष तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. कोणत्याही प्रकारच्या युद्ध क्षेत्रावर जाऊन शत्रूला नष्ट करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे प्रशिक्षण येथे दिले जाते.”

एमआयआरसी हे लष्कराचे अत्याधुनिक प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. येथे सामान्य युवकाचे सैनिकात रूपांतर केले जाते. त्यानंतर या जवानांना ड्रायव्हर, गनर आणि ऑपरेटर (रेडिओ रडार) साठीचे विशेष प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती देण्यात आली.

एमआयआरसीचे प्रमुख वाहन बीएमपी हे वाहन आहे. हे वाहन जमिनीबरोबरच पाण्यावरही चालू शकते. त्यात सहा सैनिक बसवून नेण्याची व्यवस्था असते. यावेळी या वाहनाची सर्व तांत्रिक माहिती देण्यात आली. याशिवाय येथे जवानांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकही घडवले जातात. येथे कमीत कमी खर्चात सिम्युलेटरच्या साह्याने उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. कार, ट्रक आदी वाहनांची, तसेच रायफलच्या नेमबाजीची सिम्युलेटर पत्रकारांना दाखवून त्यांची माहिती देण्यात आली.

एमआयआरसीतील कर्नल डी. के. बिश्ट यांनी मणिपूरमध्ये अतिरेक्यांशी लढताना, तर मेजर अनिल चौहान यांनी काश्मीरमध्ये अतिरेक्याशी लढताना विशेष शौर्य दाखवून बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना गॅलंट्री अवाॅर्ड मिळाले आहे. त्यांनीही आपले अनुभव पत्रकारांना सांगितले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र
एमआयआरसीलाआंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून येथे प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवला जातो. चाकोरीबद्ध कार्यक्रमाऐवजी येथे प्रशिक्षणाचा सतत आढावा घेऊन सुधारणा केल्या जातात. येथील प्रशिक्षण सुविधा पाहून अमेरिका, श्रीलंका, कझाकस्तान, म्यानमार आदी मित्र देशांच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन प्रशिक्षण घेतले आहे. एमआयआरसीत अिधकाऱ्यांसाठी सुद्धा विशेष कौशल्यांचे अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात. येथील प्रशिक्षण म्हणजे एक प्रकारचा ‘ब्रँड नेम’ तयार व्हावा, असे प्रयत्न करण्यात येत आहेत.

पर्यावरण रक्षणातही आघाडी
एमआयआरसीच्याशेकडो एकर जमिनीवर हिरवाई फुलवली आहे. त्यासाठी खास ‘एमआयआरसी ग्रीन’ ‘फेज १’ ‘फेज २’ असे प्रकल्प राववण्यात आले. त्याअंतर्गत लाखो झाडे लावण्यात आली. पूर्वी जेथे गवतही उगवत नव्हते, अशा माळरानावर दाट जंगल उभे राहिले आहे. त्याच्या आश्रयाला वन्यप्राणीही आले आहेत. एमआयआरसीने निर्माण केलेल्या या हिरवाईमुळे त्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. तसेच नगर शहरापेक्षा या भागात तापमान ते अंशांनी कमी असते, असे एमआयआरसीतील अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. या कामाबद्दल एमआयआरसीला केंद्र सरकारचा इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीचा ‘ग्रीन गव्हर्नन्स’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

पॅराग्लायडिंगचे अभ्यासक्रम
एमआयआरसीतऑलिंपिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आहेत. येथील जलतरण तलाव त्याच दृष्टीने तयार करण्यात आला आहे. या शिवाय येथे विद्यार्थी दशेतच खेळाडू घडवण्यासाठी ‘बॉईज स्पोर्टस कंपनी’ कार्यरत आहे. ऑलिंपिकसाठी खेळाडू घडवण्याचे काम येथे सुरू आहे. तेथे तिरंदाजी (आर्चरी) नेमबाजीसाठी (रायफल शुटिंग) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. याशिवाय एमआयआरसीत पॅरा ग्लायडिंगचेही अभ्यासक्रम चालवले जातात.