आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह आढळला विहिरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या वाकडी (ता. राहाता) येथील सोनाली मच्छिंद्र साळुंके (२१) या नवविवाहितेचा मृतदेह चितळी येथील विहिरीत आढळला. सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. अंत्यसंस्कार घरातच करण्याचा हट्ट तिच्या कुटुंबीयांनी धरल्याने वाकडी येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण निवळले.
सोनालीचा भाऊ संदीप राजेंद्र गायकवाड (माळी चिंचोरे, ता. नेवासे) याने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात सोनालीचा पती मच्छिंद्र हरीश साळुंके याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सासरा हरीश, सासू बेबी, भाया अमोल साळुंके, जाऊ सविता, नणंद राणी राजेंद्र कोरडे व नंदई राजेंद्र कोरडे अशी आरोपींची नावे आहेत. सासू व सासऱ्यास अटक करण्यात आली.
तणावपूर्ण वातावरण
सोनाली हिने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत माहेरच्या माळीचिंचोरे येथील लोकांनी संतप्त होऊन अंत्यविधी घरासमोरच करण्याचा आग्रह धरला. मोठा जमाव जमल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिस उपअधीक्षक राकेश ओला व सहायक पोलिस निरीक्षक नितीन पगार यांनी मध्यस्थी केली. तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश शेळके, माजी सरपंच अनिल शेळके, बापू लहारे यांनी माळी चिंचोरे येथील लोकांशी चर्चा केली. त्यानंतर सोनाली हिच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.