आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षांचा विचार करून विकासाचे नियोजन : जगताप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीत जनतेने विकासाला साथ देऊन मला विजयी केले. नगरकरांना दिलेल्या शब्दानुसार पुढील 20 वर्षांचा विचार करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनी नुकतेच दिले.
प्रभाग 25 मधील आदर्शनगर, व्यंकटेश कॉलनी, अमितनगर, संग्राम सोसायटी, भावना सोसायटी, भावनाऋषी कॉलनी, जाधवनगर, साईराम सोसायटी व विद्या कॉलनीच्या वतीने आमदार जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नगरसेविका उषा ठाणगे, शरद ठाणगे, खासेराव शितोळे, पिंटू कुलकर्णी, गणेश मिसाळ, रमेश तोडमल, योगेश घोडके, जयदीप ठाणगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
जगताप म्हणाले, विकासाची साद देऊन मी निवडणूक लढवली. विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पुढील वीस वर्षांचा विचार करूनच शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे नियोजन सुरू केले आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून पुढील काळात शहरातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. यापूर्वी कल्याण रस्ता परिसरात आमदार अरुण जगताप यांच्या विकास निधीतून व महापािलकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले, असे जगताप यांनी सांगितले. शितोळे म्हणाले, जगताप यांनी महापालिकेच्या माध्यमातून या भागाकडे विशेष लक्ष दिले. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आदी प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत. राहिलेले प्रश्न लवकर मार्गी लावावेत.