आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार हा लोकशाहीतील महत्त्वपूर्ण घटक : महापौर जगताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आचार्यबाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण' हे वृत्तपत्र सुरू करून या माध्यमातून समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडले. आजही लोकशाहीतील सर्वात मोठा घटक पत्रकारच आहे, असे प्रतिपादन आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनी मंगळवारी केले.
पत्रकार दिनानिमित्त महापालिकेत महापौर जगताप यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, पत्रकार गोरख शिंदे, अरुण नवथर, संदीप रोडे, मयूर मेहता, सय्यद वहाब, श्रीराम जोशी, मयूर डांगे, शेख इक्बाल, सुशील थोरात, शब्बीर सय्यद, सुनील हारदे, स्वप्नील झोडगे, वृत्तछायाचित्रकार सिद्धार्थ दीक्षित, समीर मन्यार, लहू दळवी, बबलू शेख आदी उपस्थित होते.
महापौर म्हणाले, पत्रकार दिनाच्या दिवशी शहर बससेवा सुरू झाली, याचा आम्हाला आनंद आहे. बससेवा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. तथापि, त्या मार्ग काढण्यात आला. नगरकरांनी माझ्यावर शहर विकासाची जबाबदारी टाकली आहे. शहरासाठी चांगले काम करायचे आहे. त्याला पत्रकारांची साथ मिळावी. यावेळी पत्रकार सय्यद वहाब, रोडे, जोशी, थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. पत्रकार दिनी महापालिकेतर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर संग्राम जगताप, नगरसेवक संपत बारस्कर, पत्रकार गोरख शिंदे, अरुण नवथर, संदीप रोडे, मयूर मेहता, सय्यद वहाब, श्रीराम जोशी, मयूर डांगे, शेख इक्बाल, सुशील थोरात, शब्बीर सय्यद, सुनील हारदे उपस्थित होते.