नगर- आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिका-यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. शनिवारी दुपारी राठोड सावेडीतील सेतू कार्यालयात विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते.
त्या वेळी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड यांच्यासह अशोक दहिफळे, भीमा आव्हाड, विजय बोरुडे, गणेश शेंडगे, संजय शेंडगे, खेडकर व इतर शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या घालून घोषणाबाजी केली. कॉन्स्टेबल सुरेश माळींनी दिलेल्या फिर्यादीवरुन या सर्वांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.