आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी, आमदार अरुण जगताप यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एमआयडीसीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शहराच्या नेतृत्वाकडून एमआयडीसीचा एकही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही. विधानसभेत गप्प बसणारे आमदार शहराचे प्रश्न काय सोडवणार? असा सवाल करत उद्योजकांनी एमआयडीसीचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन आमदार अरुण जगताप यांनी केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ एमआयडीसीत आयोजित मेळाव्यात आमदार जगताप बोलत होते. यावेळी उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, दौलत शिंदे, संजय बंदिष्टी, नसीर शेख, संजय कटारिया, मिलिंद गंधे, दिनेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ज्या भागाचे आपण नेतृत्व करतो, त्या भागाचा विकास करण्याचे कर्तव्य आहे. परंतु, शहराचे आमदार यापासून चार हात लांब आहेत. ज्यांच्या जिवावर आमदार झाले, त्या शिवसैनिकांना संपवण्याचे काम त्यांनी केले. अंबादास पंधाडे, किशोर डागवाले, सतीश मैड, दीपक सूळ, गणेश भोसले आदी शिवसैनिकांचे पंख छाटण्याचे काम केले. याउलट राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांनी शहर विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले, असेही ते म्हणाले.