आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार औटी यांचे उपोषण मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - प्रलंबित प्रश्न महिनाभरात मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी संतोष भोर यांनी दिल्यानंतर आमदार विजय औटी यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात सुरू केलेले उपोषण मागे घेतले. दरम्यान, बाभूळवाडे व दरोडी ग्रामसेवकांवर अपहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेतांना जोडणार्‍या रस्त्यांसह विविध 150 प्रकरणे प्रलंबित होती. या प्रकरणी आमदार औटी यांनी वेळोवेळी सूचना देऊनही ही कामे मार्गी लागत नव्हती. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता़ तालुक्यातील विविध रस्त्यांची डागडुजी, महावितरणकडील प्रलंबित प्रस्ताव, ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार, पोखरी येथील ग्रामसेवकाची सलग तीन महिने दांडी आदी प्रश्नांसंदर्भात औटी यांनी शुक्रवारी उपोषण सुरू केले. सभापती सुदाम पवार, युवक नेते अनिकेत औटी, माजी सभापती गंगाराम बेलकर, शाहीर गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके, सरपंच अण्णासाहेब औटी, उपसरपंच नंदकुमार देशमुख, सुरेश बोर्‍हुडे, गणपतराव देशमुख, सुरेश पठारे, रवींद्र पुजारी, विठ्ठल औटी, पांडुरंग खोडदे, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख राहुल झावरे, अभय औटी आदी यावेळी उपस्थित होत़े प्रांताधिकारी भोर यांनी आमदार औटींशी चर्चा केली़ अडवलेल्या रस्ता प्रकरणात हस्तक्षेप करणार्‍या शरद झावरे यास गुरुवारी पारनेरहून कार्यमुक्त केल्याचे व महिनाभरात प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रांताधिकार्‍यांनी दिल्यानंतर औटींनी उपोषण मागे घेतले. पोखरी येथे ग्रामसेवकाची तत्काळ नियुक्ती करू, असे त्यांनी सांगितले. बाभुळवाडे व दरोडीच्या ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी बीडीओ किरण महाजन यांना दिले.
‘त्या’ तिघांवरही कारवाई व्हावी
पाथर्डी येथे नियुक्ती असूनही जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांशी संगनमत करून शरद झावरे हा लिपिक दीड वर्षापासून पारनेरात कार्यरत होता. आमदार औटींनी याबाबत आवाज उठवल्याने त्याची बदली करण्यात आली. वाळूतस्करी, कूळ कायदा आदी विभागात नागरिकांची अडवणूक करून पैसा उकळणारे आणखीही तीन कर्मचारी तहसीलमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.