आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवीस वर्षांत ‘त्यांनी’ नगरला बनवले टपऱ्यांचे शहर, खासदार दिलीप गांधी यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या पंचवीस वर्षांत एकही गाळा उभारला गेला नाही, महापालिकेचे उत्पन्न वाढेल असे एकही काम त्यांच्याकडून झाले नाही. उलट त्यांनी नगरला टपऱ्यांचे शहर केले, अशी टीका खासदार दिलीप गांधी यांनी माजी आमदार अनिल राठोड यांचे नाव घेता केली. सत्ता असताना त्यांनी विकास केला नाही, आता विकासाच्या काय गप्पा मारता? असा सवाल करुन सर्व पुढारी हे गटारीचे आहेत. त्यांनी केवळ ड्रेनेज, खड्डे यालाच महत्त्व दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला. 
 
दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात श्रीगणेशाची आरती शुक्रवारी सकाळी खासदार गांधी यांच्या हस्ते झाली. यानिमित्ताने त्यांच्याशी दिव्य मराठीने संवाद साधला. उपमहापौर श्रीपाद छिंदम, दिशान अॅडव्हार्टझिंगचे किशोर गांधी, भाजपचे शहर सरचिटणीस किशोर बोरा, खजिनदार विवेक नाईक, गायिका नंदिनी गायकवाड, अंगद गायकवाड, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मुनाेत आदी यावेळी उपस्थित होते. 
 
खासदार गांधी म्हणाले, बीआरजीएफ योजनेतून ३२ कोटी रूपये शहरासाठी मिळाले होते. मात्र, ते सर्व गटारीच्या कामातच त्यांनी घातले. फेज च्या कामाला सन २०१२ मध्ये मंजुरी मिळाली होती. हे २०१७ वर्ष आहे. अजून हे काम पूर्ण झाले नाही. त्याला दोषी कोण? कुणाचे नियोजन चुकले? शहराच्या विकासात महापालिकेचे अभियंते हे शनिप्रमाणे उभे आहेत. त्यांच्यामुळे शहराचा विकास रखडला आहे. शहरविकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या अमृत योजनेसाठी शंभर कोटींचा निधी मिळणार अाहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांना पत्र देऊन या योजनेत नगरचा समावेश करण्याची मागणी केली होती. केवळ आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मिळणार आहे. या योजनेच्या निधी वितरणासाठी खासदार, जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समितीला डावलून काहीजण परस्पर हा निधी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार गांधी यांनी केला.
 
अमृत योजनेसाठी ६० टक्के आगाऊ रक्कम भरण्याचे निर्देश आहेत. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे हा ६० टक्के अर्थात कोटींची अागाऊ रक्कम सरकारनेच भरावी, यासाठी केंद्र सरकारला पत्र दिले आहे. शहरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्राकडून निधी आणणार आहे, असे खासदार गांधी यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी नवी वीज उपकेंद्राचे देखील काम केले नाही.आलेला निधी हा परत गेला.निधी खर्चासाठी सात वर्षात अनेक बैठका झाल्या मात्र मात्र निधी खर्च होऊ शकला.शहराच्या विकासासाठी मी माझ्या बँकेमार्फत कर्ज देण्यास तयार आहे. मात्र प्रशासनाची मानसिकता विकासकामे करण्याची नाही. 
 
पक्षाची ताकद जनता वाढवते 
गेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ तास अगोदर भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, तरीदेखील १२३ उमेदवार निवडून आले. याचाच अर्थ भाजपची ताकद वाढत आहे. आतापर्यंत शहरात भाजपच्या २१ शाखा सुरु करण्यात आल्या आहेत. आगामी तीन महिन्यांत नगर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात भाजप रुजवला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...