आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद व मंत्रिपदाचा संबंध नाही : आमदार मेटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - शिवछत्रपती स्मारक समितीचे अध्यक्षपद व मंत्रिपदाचा काहीही संबंध नाही. दोन्ही विषय वेगळे आहेत. विस्तार कधी करायचा, कुणाला स्थान द्यायचे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. घटक पक्षांबाबत दुजाभाव भाजपकडून होत नाही, असे शिवसंग्रामचे संस्थापक तथा आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.

बीडकडे जाताना पाथर्डी, शेवगावच्या कार्यकर्त्यांनी मेटे यांचे स्वागत केले. यावेळी शेवगावचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसरवाडे, खडक्याचे सरपंच कडू पाटील वडघणे, अशोक गाडे, चंद्रकांत भापकर, बबन जेधे, ज्ञानेश्वर कोकाटे, अशोक गाडे, चंद्रकांत भापकर, बबन जेधे, ज्ञानेश्वर कोकाटे, योगेश जेधे यासह बीडचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार मेटे म्हणाले, मुंबईच्या समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक व्हावे, अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे. ते काम आपल्या हातून व्हावे, यापेक्षा दुसरे भाग्य नाही. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी स्मारकासाठी काहीही केले नाही. स्मारकासाठी गेल्या २५ वर्षांपासून आपण झटत आहोत. केवळ पुतळा बसवून काम संपेल असे नसून या स्मारकामध्ये छत्रपतींचे सर्वांगीण कर्तृत्व, नैतिक, धार्मिक, सामाजिक राजकीय, राष्ट्रीय अशा मुद्यांवरून स्मारकाचे काम पूर्ण होईल. जगाला छत्रपतींचे महत्त्व कळावे. प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी व जगाने त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, असे भव्यदिव्य काम होणार आहे.

अध्यक्षपदावरील वर्णीमुळे मंत्रिमंडळातील हक्क डावलला गेला, असा अर्थ काढू नये. दोन्ही पदे भिन्न आहेत. अवघ्या चार जागा विधानपरिषदेच्या होत्या. दोन घटक पक्षाला, एक मित्रपक्षाला देऊन एकच जागा भाजपच्या वाट्याला राहिली. ज्यांनी जीवनभर कष्ट उपसले, प्रामाणिक सेवा केली त्यांना गेल्याने फार काही वेगळे घडले असे नाही, असे ते म्हणाले.