आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Narendra Ghule Rally At Pathardi, Latest News In Divya Marathi

भावनेच्या भरात जाऊन स्वत:ची फसगत करू नका, आमदार नरेंद्र घुले यांचे मतदारांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- जिथे मते जास्त, तेथेच विकासकामे, जेथे मते नाहीत, तेथील कामे करायची नाहीत असे विरोधकांचे धोरण आहे. अशा धोरणाला कायमची मूठमाती द्या. आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यामागे होता, त्यांनी या परिसरासाठी काय केले? भावनेच्या भरात जाऊन स्वत:ची फसगत करू नका, असे आवाहन नरेंद्र घुले यांनी केले.
कोरडगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष भीमराव फुंदे होते. या वेळी अ‍ॅड. प्रताप ढाकणे, बाळासाहेब ताठे, अ‍ॅड. सुनील राजळे, शिवकन्या कचरे, रामकृष्ण नागरे, बंडू बोरूडे, काकासाहेब नरवडे आदी उपस्थित होते. घुले म्हणाले, निवडणुका हाच एकमेव विकासाचा मार्ग होऊ शकत नाही. केवळ स्वार्थासाठी मतांचे राजकारण करून लोकांना फार दिवस झुलवत ठेवता येत नाही. टंचाईत जायकवाडी योजनेतून चर खोदून अव्याहत पाणीपुरवठा केला. भाजप शेतकरीविरोधी पक्ष आहे. शेतमालाचे भाव गडगडले. पाच महिने झाले अच्छे दिन कुठे गेले? फळबागांचे नुकसान होऊन बागा उद्ध्वस्त झाल्या. हुकूमशहा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी वागतात, असा आरोप घुले यांनी केला. 27 टक्के भांडवलदारांसाठी 73 टक्के शेतकऱ्यांचे वाटोळे ते करत आहेत. आमदार घुलेंनी जो विकास केला, तो 60 वर्षांत कुणी करू शकले नाही. अफवा, गैरप्रकारांना थारा देऊ नका, मतदानासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उपसरपंच भोरू म्हस्के यांनी केले.