आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुदायिक विवाह सोहळ्यात होणार आमदार जगतापांचे शुभमंगल, तिसऱ्या वहिनींची एन्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - तालुक्याचे आमदार राहुल जगताप यांच्या विवाहाची पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथे लगीनघाई सुरू आहे. रविवारी सायंकाळी सामुदायिक विवाह सोहळ्यात हजारोंच्या साक्षीने आमदार जगताप विवाहन बंधनात अडकणार आहेत. यांनी पारंपारिक राजकीय पार्श्वभूमी असलेली मुलगी निवडता नोकरदार असलेल्या व्यक्ती डॉक्टर मुलगी निवडली आहे, याची विशेष चर्चा आहे. 
 
आमदारांच्या लग्नासाठी संपूर्ण तालुक्यात मोठी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे आमदार कधी लग्न करणार कोणाशी करणार याची बड्या नेत्यांपापासून सामान्यांपर्यंत उत्सुकता होती. ती आता संपली आहे. शहर औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (रा.म्हाळुंगे, कोल्हापूर) सध्या पुणे येथे स्थायिक झालेले राजेंद्र चव्हाण यांच्या कन्या डॉ. प्रणोती यांच्याशी आमदार जगताप विवाहबद्ध होत आहे. त्या उच्च शिक्षित वैद्यकीय पदवीधर आहेत. अनेक बड्या राजकीय नेत्यांकडील प्रस्ताव नाकारून आमदारांनी एका डॉक्टरला पसंती दिली हे विशेष. 
या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी अनेक दिवसांपासून सुरु आहे. तालुका, जिल्हा राज्यातील अनेक भागांत मिळून या लग्न सोहळ्याच्या हजारो पत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदारांसह काँग्रेस मधील अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी आवर्जून हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले. लोकशाहीतील तालुक्यातील सर्वोच्चपद असणाऱ्या आमदाराचा विवाह देखील लोकशाहीला अनुसरूनच होत आहे. फक्त स्वतःचा शाही विवाह करण्याऐवजी सामुदायिक विवाहात आपले लग्न करण्याचा मनाचा मोठेपणा आमदारांनी दाखविला आहे. त्यासाठी वडील कुंडलीकराव जगताप यांनी दिलेली संमती देखील महत्त्वाची आहे. 

या सामुदायिक लग्न सोहळ्यातील अन्य नऊ जोडप्यांच्या लग्नाचा खर्च स्वतः जगताप उचलणार आहेत. लग्नातील खर्चाची चिंता या जोडप्यांची मिटली आहे. मात्र त्यापेक्षा ही आमदारांच्या मांडवात स्वतःचे लग्न होत असल्याचे अप्रूप या भावी दाम्पत्यांना वाटत आहे. जगताप यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहेत. 

या लग्न सोहळ्याचा थाट-माट पाहुण्यांचे आदर-स्वागत कोठेही कमी पडणार नाही, याची दक्षता जगताप कुटुंबीय घेत आहेत. लग्नात सुरूची जेवणाचा बेत आहे. हजारो लोकांना एका मंडपात जेवता येईल एवढी व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. तसेच गर्दीमुळे लग्न सोहळा पाहण्यास अडथळा येवू नये म्हणून मोठे स्क्रीन लावण्यात आले आहे. लग्नातील सहभागींसाठी अष्टगंध, अक्षता गुलाब पुष्पाने स्वागताची तयारी केली गेली आहे. व्हीआयपींसाठी स्वतंत्र कक्ष आहे. 

तिसऱ्या वहिनींची एन्ट्री 
तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर तिसऱ्या वहिनींची एन्ट्री होत आहे. तालुक्यातील तीन शक्तिशाली नेते दादा या उपनावाने ओळखले जातात. (बबनराव दादा, राजेंद्र दादा राहुल दादा) त्यांच्या पत्नींना कार्यकर्ते वहिनी संबोधतात. प्रतिभा पाचपुते, अनुराधा नागवडे या दोन वहिनीनंतर आता तिसऱ्या वहिनींची राजकीय पटलावर नोंद होईल. 

सुकाळ शुभमंगल 
दुष्काळपाणी टंचाई यामुळे कोणी मुलगी देत नसल्याची खंत राहुल जगताप हे आमदार होण्यापूर्वी जाहीर भाषणातून व्यक्त करीत. आमदार झाल्यावर ही खंत त्यांनी बंद केली. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. ओला दुष्काळ काही ठिकाणी पाहायला मिळाला. यंदा आमदारांचे शुभमंगल होत आहे. सुकाळ अन शुभमंगलाचा योग जुळून आल्याची चर्चा आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...