आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रासेयो माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य' - आमदार संग्राम जगताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महा विद्यालयांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येतात, त्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. न्यू आर्टस् व पाऊलबुध्दे महाविद्यालयातर्फे आयोजित स्वच्छता मोहिमेत जगताप बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सिद्धीबागेत स्वच्छता मोहीम राबवली. जगताप म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते.
समाजातही चांगला संदेश जातो. सक्षम पिढी घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत महत्त्वपूर्ण कार्य होते. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना समजले पाहिजे. गाव पातळीवर पाणी आडवा पाणी जिरवा, शासकीय योजना, श्रमदानातून विविध कामे, विविध आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबवले पाहिजेत, असे आवाहन जगताप यांनी केले. स्वच्छता माेहिमेत सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.