आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिक मंचासाठी आमदार निधीतून करणार मदत, महापौर तथा आमदार जगताप यांचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- समाजातील ज्येष्ठ नागरिक तरुणांचे मार्गदर्शक आहेत. संस्कृती व परंपरा जपण्याचे काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकरिता योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे उपलब्ध झालेल्या जागेचा आमदार निधीतून विकास करू, असे आश्वासन महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनी दिले.
सावेडीतील ज्येष्ठ नागरी मंचाच्या ज्येष्ठराज या वार्षिकांकाचे प्रकाशन जगताप यांच्या हस्ते व सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. रावसाहेब पटवर्धन स्मारकात झालेल्या या कार्यक्रमास मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर करवंदे, कार्याध्यक्ष अशोक सरनाईक, उपाध्यक्ष अशोक नवले, ज्योती केसकर, शरद कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, आदिनाथ जोशी, सुरेश कुलकर्णी, पद्माकर देशपांडे, सुनीता पाटील, सुमन वारे, नगरसेविका वीणा बोज्जा, मनीषा बारस्कर, िहंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे, कवी चंद्रकांत पालवे, डी. एम. कांबळे आदी उपस्थित होते.
या वेळी गडाख म्हणाले, नगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाने विविध उपक्रमांबरोबरच नेत्रदानाचा संकल्प करून कौतुकास्पद कार्य केले आहे. वयाने जास्त असूनही त्यांचा उत्साह, चैतन्य वाखाणण्याजोगे आहे.
प्रास्ताविकात सरनाईक यांनी ज्येष्ठ नागरिक मंचाच्या जागेभोवती आमदार जगताप यांनी आपल्या िनधीतून संरक्षक भिंत उभारून देण्याची मागणी केली.
करवंदे म्हणाले, ज्येष्ठराज अंक ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिमा व प्रतिभेचा आरसा आहे. ज्येष्ठराज अंकाचे संपादक सर्वोत्तम क्षीरसागर यानी अंकाबद्दल माहिती दिली. अंकाकरिता सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
लग्नाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या दांपत्यांचा गौरव या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष ज्योती केसकर यांनी केले, तर आभार िशरीष कुलकर्णी यांनी मानले. येत्या २५ जानेवारीला तारकपूर येथील िववेकानंद हायस्कूलमध्ये ज्येष्ठ नागरिक मंचाचे वार्षिक स्नेहसंमेलन सकाळी ९ ते ४ या वेळेत होणार आहे.

गडाखांचा पुढाकार
शहरात ज्येष्ठ नागरिक संघटित व जागरूक असल्याने त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक हे िवभक्त असल्याने ते दुर्लक्षित राहिले आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी पुढाकार घेऊन नेवासे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लावले आहेत, असे प्रशांत गडाख यांनी या वेळी बोलताना सांगितले.