आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Sangram Jagtap Guid In Students Parliament Session

छात्र संसदेच्या अधिवेशनात जगताप करणार मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देशभरात विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अग्रेसर असलेल्या भारतीय छात्र संसदेत आमदार संग्राम जगताप मार्गदर्शन करणार आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेचे विश्वस्त छात्र संसद अधिवेशनाचे संयोजक राहुल कराड यांनी जगताप यांना तसे निमंत्रण दिले आहे. भारतीय छात्र संसदेच्या अधिवेशनात मार्गदर्शन करण्याचा गौरव हा माझा नसून तो नगर शहराचा असल्याचे जगताप यांनी सांगितले.
भारतीय छात्र संसदेच्या अधिवेशनात आतापर्यंत देशासह परदेशांतील राजकीय, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. सुमारे २५ हजार युवक-युवतींसह या अधिवेशनाच्या माध्यमातून संवाद साधला जातो. देशभरात हे अधिवेशन नावाजले आहे. या अधिवेशनात कमी वयात मार्गदर्शन करण्याची संधी जगताप यांना लाभली आहे. कराड यांनी नुकतीच नगर येथे बैठक घेतली. या बैठकीत अधिवेशनात मार्गदर्शन करण्याचे निमंत्रण त्यांनी जगताप यांना दिले. यावेळी कराड यांनी नगरमधील विविध शैक्षणिक संस्था त्यांच्या उपक्रमांबाबत माहिती घेतली.
नगरमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुणे येथे जावे लागते. त्यामुळे पुण्यातील शिक्षण सुविधा नगरमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कराड यांनी सांगितले. यावेळी आमदार अरुण जगताप, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, नगरसेवक अजिंक्य बोरकर, जितू गंभीर, बाबासाहेब गाडळकर आदी उपस्थित होते.