आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील रस्त्यांसाठी साडेपाचशे कोटींचा प्रस्ताव, आमदार संग्राम जगताप यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप शहर विकासासाठी कोणते प्रयत्न करणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागले होते. शहरातील डीपी रोडचा सर्व्हे करून रस्त्यांसाठी साडेपाचशे कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करणार असल्याची माहिती त्यांनी एका कार्यक्रमात दिली.
पाइपलाइन रस्त्यावरील जय भद्रा युवा प्रतिष्ठानतर्फे जगताप यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शेषराव कऱ्हाडे, बाबू जपकर, जमीर शेख, अम्मू शेख, नितीन निंबाळकर, राजू भंडारे, कुणाल मराठे, सुहित देवकर, गणेश धाडगे, सागर बारहाते, गणेश शिंदे, तुषार दारकुंडे, सोन्याबापू जोशी, गौरव कुऱ्हाडे, अविनाश नागूल आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, शहराचा विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने प्रश्न मार्गी लावले जातील. उपनगरांतील वसाहती व लोकसंख्याही झपाट्याने वाढते आहे. मनपाच्या वतीने डीपी रोडचे सर्वेक्षण करून या कामासाठी राज्य व केंद्राकडे ५५० कोटींचा प्रस्ताव सादर केला जाईल. पाणी, वीज, रस्ते, गटारे आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यावर आपण भर देऊ. लवकरच शहरातील पाणीयोजनेचे काम मार्गी लागणार असून मुबलक पाणी उपलब्ध होईल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेचे कामही लवकरच सुरू करून सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावू. शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले जाणार आहेत. सरकार कोणतेही असो, विकासकामे करण्यासाठी आत्मविश्वास लागतो. त्याबरोबरच पाठपुरावाही करावा लागतो, तरच प्रश्न सुटतात, असे जगताप म्हणाले.