आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांत धार्मिकता वाढीसाठी मंदिरांचा विकास आवश्यक, आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - धार्मिकतेची वाढ व्हावी, तरुणांत धार्मिकतेचे प्रबोधन व्हावे, यासाठी मंदिरांचा मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. शहरामध्ये आमदार निधीतून सभामंडपाचे परिसरातील सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ताठे मळ्यात अनेक वर्षांपूर्वीचे लक्ष्मीमातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसराचा विकास व्हावा, यासाठी विलास ताठे यांनी आपणाकडे पाठपुरावा केला. यासाठी पेव्हिंग ब्लॉक, वृक्षारोपण करून मंदिर परिसरामध्ये धार्मिकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
 
प्रभाग क्रमांक १३ मधील ताठे मळ्यातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना जगताप बोलत होते. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, दगडू पवार, विलास ताठे, मयूर ताठे, अप्पासाहेब पडोळे, बाळासाहेब पडोळे, संजय क्षेत्रे, नामदेव पडोळे, अनिल ताठे, शंकर खेडकर, अरुण शिंदे, सचिन शिंदे, दीपक खेडकर, सचिन जगताप आदी उपस्थित होते. कळमकर म्हणाले, महालक्ष्मी उद्यान, पंपिंग हाऊस स्टेशन परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यामुळे या परिसराला विकासाची दिशा मिळाली आहे. आमदार जगताप यांनी महापौर असताना रस्ता मंजूर करून तो पूर्ण करून घेतला. 
 
बातम्या आणखी आहेत...