आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरची उमेदवारी मलाच : आमदार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाजप-शिवसेना महायुतीतर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत भाजपचे महामंत्री व आमदार प्रा. राम शिंदे यांनी रविवारी दिले. याबाबत बुधवारी (5 फेब्रुवारी) निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजप युवा मोर्चातर्फे जामखेड येथील विर्शामगृह मैदानात युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नूतन पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्र आमदार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मेळाव्यास भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, सभापती डॉ. भगवान मुरूमकर, तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ ओमासे, संपत राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे यांनी आपल्याला महायुतीतर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिले. सहा महिन्यांपूर्वीच शिंदे यांनी खर्डा येथील आमदार पंकजा पालवे-मुंडे यांच्या सभेत नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास लढवण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर लोकसभेसाठी आमदार शिंदे यांचे नाव चर्चेत येऊ लागले.

जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेचे आमदार शिवाजी कर्डिले, अनिल राठोड, विजय औटी, अशोक काळे हे शिंदे यांना लोकसभेवर पाठवण्यास उत्सुक आहेत. त्यांचाही शिंदे यांच्या नावाला अधिकृत पाठिंबा असल्याचे समजले.