आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mla Shivaji Cordile Comment On Late Rain Condition In Nagar

छावण्या सुरू करा : कर्डिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष व जनावरांसाठी चा-याची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात चारा डेपो किंवा छावण्या सुरू करा, अशी मागणी आमदार शिवाजी कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पावसाअभावी पिण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चा-याची चणचण भासत आहे.
चारा डेपो, छावण्यांमधून चारा उपलब्ध करून देण्याची मागणी कर्डिले यांनी केली. बुºहाणनगर, घोसपुरी, मिरी-तिसगाव, बारागाव नांदूर, कुरणवाडी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा थकीत बिलाच्या कारणांमुळे बंद करू नये, या योजनांचे पाणी पोहोचत नसलेल्या गावांमध्ये टँकर मंजूर करावे, भांगडा चारीसाठी मंजूर झालेल्या निधीपैकी अठरा कोटींचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. शिल्लक असलेल्या चार कोटींतून भांगडा चारीवर एक्स्प्रेस फीडर बसवून पाइपलाइनची दुरुस्ती करावी. वांबोरी चारीच्या टप्पा दोनची चार वर्षांपूर्वीची रक्कम 38 वरून 53 कोटींंवर गेली आहे. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावर राहुरी मतदारसंघातील 21 गावांचा समावेश असून या कालव्याच्या कामासाठी 67 कोटी रुपये मागणी प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी कर्डिलेंनी केली आहे.