आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळवंडेसाठी राधाकृष्ण विखेंना एक रुपयाही मिळवता आला नाही, आमदार तांबे यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिचड या दोघांच्या प्रयत्नांतून निळवंडे धरणाची निर्मिती झाली. अन्य कोणत्याही नेत्याचे यात योगदान नाही. योगदान देणाऱ्यांनी शिर्डी संस्थानच्या पाचशे कोटींच्या घाेषणेच्यावेळी केवळ प्रसिद्धी आणि खोट्या श्रेयासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत फोटो काढले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना अद्याप एक रुपयाही धरणासाठी मिळवता आला नाही. त्यांचे धरण आणि कालव्यांसाठी योगदान काय, असा प्रश्न करत आमदार थोरात यांच्यावरील आरोप म्हणजे दुष्काळग्रस्तांची चेष्टा असल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी गुरूवारी केली. 

विखे यांनी राहाता तालुक्यातील कार्यक्रमात बोलताना निळवंडे कालव्यांसाठी साईबाबा संस्थानकडून मंजूर झालेला पाचशे कोटींचा निधी मिळू नये, यासाठी संगमनेरचे नेते खोडा घालत असल्याची टीका केली होती. या टीकेला तांबे यांनी प्रत्युत्तर दिले. 

तांबे म्हणाले, अनेक अडचणींवर मात करत निळवंडेची निर्मिती झाली. धरणाच्या बाबतीत विखे यांनी मदत केली नाही, ते फक्त दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत. थोरात यांचा पिचड यांच्या सहकार्याने कालव्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे. अनेक भागात कालव्यांची कामे झाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत सध्याच्या सरकारकडून निधी मिळालेला नाही. त्यामुळे थोरात-पिचड सरकारविरोधात एकत्रितरित्या रस्त्यावर उतरले. त्यामुळे झुकलेल्या सरकारने साई संस्थानमार्फत ५०० कोटी कालव्यांसाठी देण्याची घोषणा केली. हे पैसे साईभक्तांचे आहेत, शासनाचा यात कोणताही निधी नाही. या घोषणेवेळी विखे फाेटोसाठी सर्वात पुढे होते. मात्र, अद्याप निधी मिळत नसल्याने आपले अपयश लपवण्यासाठी ते थोरात आणि दुष्काळी भागातील जनतेवर चुकीचे आरोप करत आहेत. सरकारशी मिलीभगत करत ते आपल्यास पक्षातील निष्ठावंत नेतृत्वावर खोटे आरोप करत प्रसिद्धी मिळवत आहेत. 

कालव्यासाठी लाभक्षेत्रातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त निधी मागणीचे आणि कालव्यांची कामे त्वरि पूर्ण करण्याचे ठराव शासनाकडे पाठवले आहेत. मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली आहे, हे विखेंना मािहती नसावे. सर्व ग्रामपंचायतीचे ठराव आणि विनंतीपत्रे शासनाकडे आहेत. निधी देऊ नका, अशी मागणी दुष्काळग्रस्त करतील तरी कशी? विखेंनी चांगली माहिती घ्यावी. सरकार निधी देत नाही म्हणून आवाज उठवावा, असे डॉ. तांबे यांनी पत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...