आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार थोरातांनी घेतला वाळूतस्करीचा समाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बास्केटबॉल आणि स्केटिंग रिंगच्या कामाचे उद्घाटन करताना आमदार बाळासाहेब थोरात. समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे आदी. छाया: विवेक भिडे. - Divya Marathi
बास्केटबॉल आणि स्केटिंग रिंगच्या कामाचे उद्घाटन करताना आमदार बाळासाहेब थोरात. समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे आदी. छाया: विवेक भिडे.
संगमनेर - प्रांताधिकारी,तहसील कार्यालयाच्या सुंदररीत्या बांधलेल्या इमारतीची अवस्था वाळूच्या पकडलेल्या वाहनांमुळे बघवत नाही. अधिकाऱ्यांनी इमारतीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी वाळूची वाहने पकडलेली बरी, त्यामुळे त्यांचेही चांगले आणि अशा खोचक शब्दात इमारतीच्या सुरू असलेल्या विद्रुपीकरणाचा समाचार आमदार बाळासाहेब थोरात यांनी घेतला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात झालेल्या बास्केटबॉल कोर्ट आणि स्केटिंग रिंगचे लोकार्पण शनिवारी आमदार थोरात यांच्या हस्ते झाला. आमदार डॉ. सुधीर तांबे यावेळी उपस्थित होते. लोकार्पण सोहळा कार्यक्रमात व्यासपीठावर नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले, भाऊसाहेब कुटे, प्रांताधिकारी संदीप नििचत, तहसीलदार शरद घोरपडे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, नगरसेवक नितीन अभंग, गोरख कुटे, गणेश मादास, सोमेश्वर दिवटे, जावेद जहागिरदार, शिक्षणाधिकारी वसंत जोंधळे आदी उपस्थित होते.

थोरात यांनी शासनाने क्रीडा समितीचे अध्यक्षपद स्थानिक आमदाराला देण्याच्या निर्णयाचा धागा पकडत संगमनेरमध्ये माझ्याऐवजी तहसीलदारांकडेच हे काम ठेवण्याचे सुचित करत महसूलच्या वाळुविषयीच्या कामावर मार्मिक टिपणी केली. संगमनेरमध्ये सुंदर तहसील आणि प्रांत कार्यालय बांधले आहे. मात्र, या कार्यालयाच्या आवारात वाळुची पकडलेली वाहने अस्ताव्यस्त लावली गेल्याने या इमारतीच्या सौंदर्याला बाधा पोहोचली. पकडलेल्या वाहनांमुळे आवारातील फरश्या खचल्या आहेत. त्यापेक्षा या वाहनासांठी वेगळे यार्ड तयार करून द्यावे लागेल. या इमारतींची देखभाल राखली गेली नाही, तर कसे करायचे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यात तालुका पातळीवर एवढे मोठे क्रीडा संकुल संगमनेरमध्ये प्रथमच उभे राहिल्याचे स्पष्ट करत या क्रीडा संकुलाची देखभाल करणे सोपे नाही. मात्र नागरिकांसाठी ते काम आवश्यक आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी बास्केटबॉलचे साहित्य उपलब्ध करून देत कुस्तीसाठी पाच लाखांची मॅट दिली याबद्दल त्यांचे कौतुक केले. तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या कामाचेही कौतुक केले. प्रास्ताविक नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीनिवास पगडाल यांनी, तर आभार पल्लवी धात्रक यांनी मानले.

नगरपालिका चालवणे सर्वांत अवघड काम
एकवेळराज्याचे सरकार चालविणे खुप सोपे आहे पण पालिका चालविणे सगळ्यात अवघड काम आहे. निळवंडेचे पाणी संगमनेरमध्ये आणले. पण विरोधकांनी पाणी धांदरफळच्या विहीरीतून काढल्याची टिका केली. त्यांनाही कार्यक्रमाला बोलावले होते, मात्र ते आले नाहीत. चांगल्या कामाचे त्यांना कौतुक नाही. निळवंडेची पाणी पातळी खाली गेल्यावर ते पंपिग करण्याच्या कामात अडचणी होत्या, त्या दूर झाल्या. मात्र दरम्यानच्या काळात पुन्हा उलटसुलट बातम्या आल्या. विरोधकांच्या आरोपांना कार्यकर्त्यांनी चांगली उत्तरे दिली. आता क्लोजर काळात पाणी आणून दाखवा आणि विरोधकांना त्यात आंघोळ घाला, असा सल्ला आमदार थोरात यांनी पाणीपुरवठा समितीच्या सभापतींना दिला.