आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींना लोकशाही नको, ते हुकूमशहा बनलेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - ज्या देशाचा पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना गुलामाप्रमाणे वागवतो तो समाजाला काय न्याय देणार? नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसले, तेव्हाच देशाची घटना पायदळी तुडवली गेली. त्यांना लोकशाही नको असून ते हुकूमशहा बनले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आमदार उषा दराडे यांनी केला.

शेवगाव येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संकेत गार्डन येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आमदार विद्या चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य उषा मोटकर, शेवगाव पंचायत समिती सभापती मंगल काटे, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष लीला मुंदडा, पद्मा पाठक, पुणे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष शिल्पा भोसले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. मेधा कांबळे, शारदा लगड, राजश्री मांढरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
दराडे म्हणाल्या, स्त्री-पुरुष समान हक्क ज्यांनी दिला त्या जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांची नावे घेण्यास मोदींना कमीपणा वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता. राज्यात भाजप-शविसेनेनेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊ दिला नाही. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नव्हतीच. आपल्याला ते कळलेच नाही. प्रास्ताविक डॉ. मेधा कांबळे यांनी, तर सूत्रसंचालन मीनाक्षी कळकुंबे केले.

पवारांचे विचार समाज घडवण्याचे
प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाईंच्या पुढे जाऊन क्रांती करावी. ही सुरुवात घरापासून करण्याची गरज आहे. मी माझ्या घराची सावित्री ठरले, तर चांगले समाजकारण करता येईल. मात्र, तसे घडत नाही. शरद पवारांचे विचार समाज घडवण्याचे आहेत, नरेंद्र मोदी हे स्वत:ची स्तुती करणारे नेते आहेत. शविसेनेने मुंबई लुटली आहे. खंडणीखोरांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मागे उभे रहा, असे आवाहन आमदार विद्या चव्हाण यांनी केले.