आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपरगाव शहरातील रात्रशाळा आमदार कोल्हेंनी घेतली दत्तक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - गेल्या२३ वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर चालणारे येथील गवारे मामा फाउंडेशनची रात्रशाळा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दत्तक घेतली, अशी माहिती सचिव पुरुषोत्तम पगारे यांनी दिली.
आमदार कोल्हे यांनी प्रजासत्ताक दिनी ही घोषणा केली. त्यामुळे मोडकळीस आलेल्या रात्रशाळेला संजीवनी मिळणार आहे. स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गंगाधर गवारे यांनी २३ वर्षांपूर्वी शोषित, पीडित, मजूर विधवा तसेच परित्यक्त्या महिलांच्या मुलांसाठी तसेच कचार गोळा करणारे, बालमजूर दारिद्र्य रेषेखालील मुलांचे अर्धवट राहिलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरात रात्र शाळा काढली होती.

अनंत अडचणी या शाळा व्यवस्थापनापुढे सध्या उभ्या ठाकल्या आहेत. ही सर्व अवस्था जाणून घेऊन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातून स्व. गवारे यांनी लावलेल्या रोपट्याचे संवर्धन करण्यासाठी ही शाळाच दत्तक घेण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. उपेक्षित वर्गासाठी सुरू केलेली ही शाळा सुरू राहिली पाहिजे. गरीब, वंचित मुलांना या संस्थेद्वारे आपले शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, या सामाजिक भावनेतून इतर दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही कोल्हे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या शाळांची स्वच्छता आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी समता पतसंस्था करीमभाई कुरेशी यांच्या माध्यमातून स्वीकारल्याचे जाहीर केले. यावेळी गवारे मामा फाउंडेशनचे अध्यक्ष भास्करराव बोरावके, सचिव पुरुषोत्तम पगारे, लायन्स क्लबचे सुधीर डागा आदींनी कोल्हे यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा. विजय शेटे, विजय नायडू, तुलसीदास खुबावी आदी उपस्थित होते. एकनाथ जाधव यांनी आभार मानले.