आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी - मनसेच्या कार्यकर्त्यांनी बिगरमराठी भाषेतील दुकानांवरील पाट्यांची गुरुवारी तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर जिल्हाप्रमुख विजय काळे, शहराध्यक्ष दाणू कोते, नाना बावके यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. नंतर न्यायालयात त्यांची जामिनावर सुटका झाली.
शिर्डीतील बहुसंख्य दुकाने व हॉटेल्सच्या पाट्या दाक्षिणात्य भाषेत आहेत. त्याला जोड म्हणून हिंदी आणि इंग्रजीत नावे टाकलेली आहेत. मराठीच्या मुद्द्यावर आग्रही असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता या फलकांना आक्षेप घेतला. पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख विजय काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी परभाषिक पाट्यांची तोडफोड सुरू केली. नगर-मनमाड रस्त्यावरील 70 ते 80 दुकानांचे, हॉटेलचे फलक तोडण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडून साईभक्तांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच त्यांनी तोडफोड करणाºया कार्यकर्त्यांना अटक केली.
फलक तोडणे चुकीचे- शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे विविध राज्यांमधून साईभक्त येथे येतात. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या भाषेत फलक लावणे गरजेचे आहे. अशा प्रकारे फलक तोडून दहशत निर्माण करणे चुकीचे आहे. प्रत्येक प्रांतातील भाषेत फलक लावण्यासाठी पोलिस आणि नगर पंचायतीने बैठक घ्यावी. शिवसेना त्यांना समर्थन देईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कोते यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.