आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Comity For Ahemdnagar Municipal Corporation Election

अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी मनसेची निवड समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवड समिती जाहीर केली. शासकीय विर्शामगृहात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मुंबई येथील सुनील बांभूळकर व नगरचे संतोष धुरी यांच्यावर संपर्कप्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वसंत लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूकपूर्व निर्णय घेण्यात येणार आहेत.

मनसेने शहरात संकल्प अभियान राबवून आतापर्यंत 20 हजार कुटुंबे पक्षाशी जोडली आहेत. निवडणुकीपर्यंत आणखी 30 हजार कुटुंबे जोडण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

येत्या मंगळवारी जळगावचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते केडगाव येथे सहा ठिकाणी पक्षाच्या शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये लोढा यांच्यासह सचिन डफळ, कैलास गिरवले, केतन नवले, सतीश मैड, किशोर डागवाले, गणेश भोसले, संजय झिंजे, मनोज राऊत, नितीन भुतारे व अनिता दिघे यांचा समावेश आहे. कार्यालयीन प्रमुख म्हणून गणेश आढाव व प्रसिध्दी प्रमुख म्हणून अभिनय गायकवाड यांची निवड करण्यात आली. बांभूळकर व धुरी हे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहतील. लोढांच्या नेतृत्वाखाली निवडणूकपूर्व सर्व निर्णय घेण्यात येतील.