आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नगरसेवक राजकीय एजंट म्हणून काम करतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नगरसेवकांतील वाद चिघळला आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी तोडपाणी करतात, असा आरोप नगरसेवकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. पदाधिकार्‍यांनी त्यास गुरूवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. नगरसेवकच राजकीय एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर मनसे पदाधिकारी नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नगरसेवकांनी पक्षादेश पाळता निवडणुकीत आघाडीला साथ दिल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी मनसेचे वरिष्ठ नेते स्थानिक पदाधिकार्‍यांवर चांगलेच तांेडसुख घेतले. वरिष्ठ नेत्यांनी मागील निवडणुकीत पैसे घेऊन पाठिंबा दिला. या निवडणुकीतदेखील त्यांनी युतीकडून पैसे घेतले, असा आरोप नगरसेवकांनी केला.

प्रत्युत्तर म्हणून पदाधिकार्‍यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, पक्षाशी विश्वासघात करणार्‍या नगरसेवकांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. या नगरसेवकांवर पक्षाने विश्वास ठेवला, परंतु या गद्दारांनी निवडून आल्यानंतर गटनोंदणी पक्षाच्या नावाने करता आघाडीच्या नावाने केली. त्यामुळे पक्षनिष्ठेच्या गप्पा त्यांनी मारू नयेत. मनसेच्या नेत्यांना लाखो रुपये दिले असल्याचा आरोप त्यांनी केला, परंतु हे पैसे तुमच्याकडे कुठून आले, हे त्यांनी अगोदर स्पष्ट करावे. नगरसेवकांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. यांच्या निष्ठा कोणत्या घराण्याशी आहेत, हे नगरकरांना माहिती आहे. स्वत:ला निवडून येण्यासाठी दुसर्‍यांचा बळी घेणार्‍या या नगरसेवकांच्या एकनिष्ठतेचे दाखले देण्याची गरज नाही. हे नगरसेवक राजकीय एजंट म्हणून काम करतात हे नगरकरांना माहिती असल्याचे पत्रकात म्हटले आहे. प्रसिध्दी पत्रकावर मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गिरीश जाधव यांची नावे आहेत.

मनसेचे अस्तित्व धोक्यात
मनसेनगरसेवक पदाधिकार्‍यांमधील चव्हाट्यावर आलेला हा वाद आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. नगरसेवक आपले गाऱ्हाणे राज ठाकरे यांच्याकडे मांडणार आहेत. ठाकरे यांनी गाऱ्हाणे ऐकले नाही, तर वेगळी वाट धरण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे. परिणामी शहरातील मनसेचे उरलेसुरले अस्तित्वही धोक्यात येईल.