आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या मनसे नेत्यांनी पाठिंब्यासाठी घेतले पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख, तसेच मुंबईतील इतर नेत्यांनी मागील दोन महापौर निवडणुकांत पैसे देऊन पाठिंबा दिला. या निवडणुकीतही त्यांनी युतीकडून पैसे घेतले, असा आरोप मनसेच्या नगरसेवकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पक्षातून निलंबन झाल्याबाबतचे कोणतेही पत्र अद्याप आम्हाला मिळालेले नाही. त्यामुळे आम्ही मनसेतच आहोत. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार आहोत. त्यांनी भेट नाकारली, तर आम्ही आमची पुढील भूमिका जाहीर करू, असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले.
महापौरपदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मनसे नगरसेवकांचे निलंबन नाट्य हे त्यापैकीच एक. निवडणुकीत युतीचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करण्याचे आदेश मनसेचे प्रदेश सरचिटणीस शिरीष सावंत यांनी गटनेते गणेश भोसले यांना दिले होते. परंतु भोसले यांच्यासह चारही नगरसेवकांनी सावंत यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आघाडीला साथ दिली. पक्षादेश पाळल्याने सावंत यांनी चारही नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतु निलंबनाबाबत अद्याप कोणतेच आदेश मिळाले नसून आम्ही अजूनही पक्षातच असल्याचे मनसे नगरसेवकांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत मनसे नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. संपर्कप्रमुख संतोष धुरी हे नगरला आल्यानंतर हॉटेलमध्ये दारू पितात. तीन-चार दिवस राहून दीड ते दोन लाख रुपये हॉटेलचे बिल करतात. अजूनही एका हॉटेलचे बिल देणे बाकी असल्याचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी सांगितले. प्रदेश सरचिटणीस सावंत यांनी आतापर्यंत पैसे घेऊन तिकीट वाटले. मागच्या महापौर निवडणुकीत आघाडीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी ३० लाख रुपये घेतले होते, असा आरोप नगरसेवक कैलास गिरवले यांनी केला. माजी महापौर शीला शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठीही त्यांनी दहा लाख रुपये घेतले होते. या महापौर निवडणुकीतही त्यांनी युतीकडून पैसे घेतले. परंतु आम्ही युतीला साथ दिल्याने त्यांनी आम्हाला निलंबित केले, असे गिरवले यांनी सांगितले.
महापौर निवडणुकीसाठी पक्षादेशाचे कोणतेही पत्र आम्हाला मिळाले नाही. निवडणुकीतील सर्व घडामोडी राज ठाकरे यांच्या कानावर घालण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. त्यांनी भेट नाकारली तर आठ दिवसांत भूमिका जाहीर करू, असे भोसले डागवाले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस संजय झिंजे, दत्ता जाधव उपस्थित होते.
महापौर निवडणुकीसाठी पक्षादेशाचे कोणतेही पत्र आम्हाला मिळाले नाही. निवडणुकीतील सर्व घडामोडी राज ठाकरे यांच्या कानावर घालण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. त्यांनी भेट नाकारली तर आठ दिवसांत भूमिका जाहीर करू, असे भोसले डागवाले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस संजय झिंजे, दत्ता जाधव उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, डागवाले-भोसले ही तर माझी मुले...आतापर्यंत आरोप का झाले नाहीत?...