आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Vasant Londhe Comment On Mla Anil Rathor Working Style In Nagar City

राजकारण - आमदार राठोड यांचे अवैध धंद्यांना संरक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आमदार अनिल राठोड यांनी जनतेच्या संरक्षणाच्या नावाखाली राजकारण करून निवडणूक लढवली. प्रत्यक्षात त्यांचे सर्वसामान्य जनतेला संरक्षण नसून अवैध धंद्यांना संरक्षण आहे, असा आरोप मनसेचे जिल्हा सचिव वसंत लोढा यांनी केला.

मनसेच्या सिद्धार्थनगर शाखेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गिरीश जाधव, मनोज राऊत, शहर उपाध्यक्ष पोपट पाथरे, शाखाध्यक्ष अनिल वाकचौरे, संजय साठे, राजू पाटोळे, संग्राम गायकवाड, गौरव शेलार, महेंद्र लोखंडे, भारत शिदे आदी या वेळी उपस्थित होते.

लोढा म्हणाले, नगर शहरात २५ वर्षांपासून आमदार म्हणून निवडून येणाऱ्या राठोड यांनी शहरातील दलित व उपेक्षित समाजाचे किती प्रश्न विधानसभेत मांडले? शहरातील दलित वस्ती वर्षानुवर्षे आहे त्याच स्थितीत आहे. दलित वस्ती सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचा मोठी निधी मिळतो. मात्र, नगर शहरातील एकाही दलित वस्तीच्या विकासासाठी राठोड यांनी कधी निधी दिला नाही. केवळ मतांसाठी ते दलितांचा उपयोग करत आहेत. संरक्षणाच्या नावाखाली राजकारण करून त्यांनी निवडणुका लढवल्या. शिवसेनेची महापालिकेत सत्ता असताना दलित वस्ती सुधारण निधी म्हणून मनपाला १ कोटीचा निधी मिळाला होता. मात्र, हा निधी आमदारांच्या आदेशानुसार दलित वस्ती विकास कामांऐवजी लोखंडी पुलाजवळील जुना दगडी पुलाच्या दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आला. अद्याप तेही काम झालेले नाही.