आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन डफळ यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांच्या रखडलेल्या नियुक्त्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्षपदी सचिन डफळ, सचिवपदी वसंत लोढा, जिल्हा उपाध्यक्षपदी संजय झिंजे, तर शहराध्यक्षपदी गिरीश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. स्वत: राज ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. महापालिकेच्या डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी कार्यकारिणी बरखास्त केली होती. तेव्हापासून नवीन पदाधिका-यांच्या निवडीची प्रतीक्षा होती. ठाकरे यांनी 13 जूनला पदाधिका-यांच्या नियुक्तीपत्रावर सह्या केल्या. ही नियुक्ती पत्रे शुक्रवारी सकाळी संबंधितांना मिळाली. त्यानंतर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डफळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पक्षाने पूर्वीचे जिल्हा संघटक हे पद गोठवण्यात आले असून दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हाध्यक्ष पदे ठेवली जाणार होती. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने पूर्वीप्रमाणेच 2 विधानसभा मतदारसंघ मिळून 1 जिल्हाध्यक्ष अशी एकूण 6 जिल्हाध्यक्षपदे ठेवण्याचा निर्णय झाल्याचे डफळ यांनी सांगितले.नगर शहर व पारनेर विधानसभा या दोन मतदारसंघांच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन डफळ, जिल्हा सचिवपदी वसंत लोढा, तर नगर शहराध्यक्षपदी गिरीश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष धुरी यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी संजय झिंजे यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले.