आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मॉडेल' रस्त्यांचे काम पूर्णत्वाकडे , रस्त्यावरील वाहतुकीचा भार होणार कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील बालिकाश्रम कोठी या दोन्ही मॉडेल रस्त्यांचे काम पूर्ण होत आले आहे. बालिकाश्रमचे ३०० कोठी रस्त्याचे १६० मीटरचे अपूर्ण काम प्रगतिपथावर आहे. हे दोन्ही रस्ते लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने स्टेशन रस्ता दिल्लीगेट रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होईल. सुमारे ३५ कोटी खर्च करून या दोन्ही रस्त्यांचे काम करण्यात आले. त्यामुळे नगरकरांची वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होणार आहे.

नगरोत्थान अभियानांतर्गत हाती घेतलेल्या बालिकाश्रम कोठी रस्त्याचे काम दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू होते. अतिक्रमणांचा अडथळा इतर तांत्रिक अडचणींमुळे बालिकाश्रम रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडले. माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेला हा रस्ता दोन महापौर बदलले, तरी अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. कोठी रस्त्याची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. तथापि, मागील काही महिन्यांपासून प्रशासनाने दोन्ही रस्त्यांच्या कामास गती दिली. बालिकाश्रम रस्त्याच्या २६०० पैकी २३०० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. नीलक्रांती चौकात रोड क्रॉसिंगसाठी पाइप टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण होताच उर्वरित ३०० मीटरला गती मिळेल. पहिल्या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण झालेला बालिकाश्रम रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु पुढील काम अपूर्ण असल्याने मनमाड रस्त्यावरून दिल्ली दरवाजाकडे जाणारी अवजड वाहतूक सुरू झालेली नाही. रस्त्याचे संपूर्ण काम झाल्यानंतर ही वाहतूक सुरू होईल. त्यामुळे पत्रकार चौक ते दिल्ली दरवाजा रस्त्यावरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल.

कोठी रस्त्याच्या दोन िकलोमीटरपैकी केवळ १६० मीटरचे काम अपूर्ण आहे. किरकोळ अतिक्रमणांमुळे ते रखडले आहे. अतिक्रमणे हटवून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे वाहतूक या रस्त्याने सुरू होऊन स्टेशन रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्नही सुटेल.
बालिकाश्रम रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होताच अवजड वाहनांची वाहतूक तेथून सुरू होईल.

महापौर कळमकर यांनी घेतला कामाचा आढावा
नवनिर्वाचितमहापौर अभिषेक कळमकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगराेत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. बालिकाश्रम कोठी रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. काही रस्त्यांच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मनपाच्या बांधकाम विभागाने रस्त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करत कामास गती देण्याचा प्रयत्न केला. सध्या पाऊस थांबला आहे. त्यामुळे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

शहरातील इतर रस्त्यांची कामे रखडलेलीच...
नगरोत्थानअभियानांतर्गत महापालिकेतर्फे नऊ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यात बालिकाश्रम, कोठी, केडगाव देवी, संजोगनगर ते दर्गा दायरा आदी रस्त्यांचा समावेश आहे. सर्व रस्त्यांची निविदा प्रक्रिया कार्यारंभ आदेश यात काही दिवसांचा फरक होता. परंतु बालिकाश्रम कोठी रस्ता वगळता इतर सात रस्त्यांची कामे अद्याप रखडलेली आहेत. केडगाव देवी रस्त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मात्र रखडले असून त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
बातम्या आणखी आहेत...