नगर - स्थिहल कंपनीतर्फे एमआयडीसी परिसरात आधुनिक शेती उपकरणांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या उपकरणांचा यात समावेश आहे. नागापूर येथील दत्ता एंटरप्रायजेससमोर हे प्रदर्शन भरले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन विशाल गणपतीचे मुख्य पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन ११ जानेवारीला सायंकाळी पर्यंत सुरु राहणार आहे.