आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरातील मोदींच्या सभेबाबत संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात शनिवारपासून प्रचारसभा सुरू झाल्या. मोदी यांची नगर मतदारसंघात सभा होणार होती. मात्र त्यांची तारीख मिळत नसल्याने सभेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पदाधिकारी व उमेदवारांनी मोदींच्या सभा घेण्याचा प्रदेश पातळीवर आग्रह धरला आहे. राज्यात मोदींच्या २५ सभा होणार आहे. नगर मतदारसंघात मोदी यांची सभा होणार होती. मात्र तारीख मिळत नसल्याने ही सभा रद्द होण्याची शक्यता आहे. आता उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी सभा घेण्याचा प्रयत्न आहे. मोदींसह पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, शहनावाज हुसैन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, िवनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या सभा होणार आहेत.