आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी केला हिवरेबाजारचा गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आकाशवाणीवरील 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिवरेबाजारचा गौरवपूर्ण उल्लेख करून तेथे पाण्याचे पिकांचे नियोजन कशा पध्दतीने केले जाते यावर भाष्य केले. पंतप्रधानांनी हिवरेबाजारचा उल्लेख केला ही बाब आम्हा ग्रामस्थांसाठी सन्मानाची आहे, अशी प्रतिक्रिया आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा करतात. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी हिरवेबाजार या गावाने पाण्याचे आदर्श नियोजन करुन कशी शेती केली, याचे दाखले दिले. ऊस, केळी यासारखी जास्त पाणी लागणारी पिके घेता कमी पाण्यात येणारी फळे, भाज्या गावकरी घेतात, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, २४ एप्रिल हा 'पंचायत राज दिन' म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवशी या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा पंतप्रधान राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येतो. "मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी यांनी हिवरेबाजारचा उल्लेख केला, ही गोष्ट गावासाठी महत्त्वाची आहे. राज्यातील २४ हजार गावे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी हिवरेबाजारमधील जलसंधारणाची कामे पीक नियोजनाचा उल्लेख केला. हिवरेबाजारचा आदर्श अन्य गावांनी घेतला, तर ती गावे टंचाईतून मुक्त होतील.