आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहरम मिरवणुकीत सामाजिक ऐक्याचे दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशभरात नावलौकिक असलेल्या मोहरमची सवारी विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत पार पडली. मंगळवारी दुपारी बारा वाजता इमाम हुसेन यांची सवारी कोठला येथून बाहेर निघाली. नंतर ती हवेलीत पोहोचली. तेथे इमाम हसन यांच्या सवारीशी तिची भेट झाली. तेथून मोहरमच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत सर्वधर्मियांनी सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.बारा इमाम कोठला ट्रस्टचे मुख्य विश्वस्त बडेसाहब जहागीरदार, शकूर शेख, खलील शेख यांच्यासह मुजावर व सर्वधर्मीय समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिंगारमध्ये लिगायत गवळी समाजातील गणेश अरुण निस्ताने यांच्याकडे गवळी वाड्यातील सवारी असते. भिंगारच्या सर्व भागात ही सवारी मिरवण्यात आली. शहरातील सर्वधर्मियांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सरबताचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या जुन्या इमारतीपासून सरबताचे वाटप करणाऱ्या गाड्या मिरवणुकीच्या बाहेर काढण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सवारींसोबत अग्निशमन दलाची गाडी, रुग्णवाहिका, तसेच पोलिस दलाच्या गाड्या होत्या. मिरवणूक मार्गावरील इमारतींची छते पोलिसांनी टेहाळणीसाठी ताब्यात घेतली होती. रात्री आठपर्यंत विसर्जन मिरवणूक महापालिकेच्या जुन्या कार्यालयापर्यंत आली होती.