आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mohata Devi Temple Navairatra Festival Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहटा मंदिरात पहिल्या महिला भाविकेचा झाला सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- घटस्थापनेनंतर देवीचा गजर होत दर्शनबारीला मोहटा मंदिरात प्रारंभ झाला. रांगेतील पहिली महिला भाविक कविता फुंदे (औरंगाबाद) यांना सन्मानाने कार्यालयात नेऊन तेथे देवस्थान समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी साडी-चोळी, देवीचे कुंकू देत खणा - नारळाने त्यांची ओटी भरली. या सन्मानाने भारावून जात या महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले.
मोहटा देवस्थान समितीच्या अध्यक्ष केवले यांच्या कल्पनेतून या वर्षीपासून हा आगळावेगळा उपक्रम सुरू झाला. पंढरपूर देवस्थान समितीप्रमाणे रांगेतील पहिल्या भाविकाला देवीस्वरूप समजून सत्कार करण्याच्या निर्णयाचे सर्व भाविकांकडून स्वागत झाले. घटस्थापनेनंतर प्रथमदर्शन घेण्यासाठी मोहटा देवस्थानात गुरुवारी मोठी गर्दी झाली. देवीचे रूप न्याहाळून तिची कृपादृष्टी व्हावी, यासाठी भाविकांचा प्रयत्न असतो. पंढरपूर देवस्थाननंतर भाविकांना मान देण्याचा प्रयत्न मोहटा देवस्थानने सुरू केला.