आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"डीजेशिवाय निघावी पैगंबर जयंतीची मिरवणूक; महिलांचा सहभागही नको'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पैगंबर जयंती सोहळा रविवारी (४ जानेवारी) साजरा होत आहे. या सोहळ्यात डीजे, ढोलवाद्ये, फटाके व महिलांचा सहभाग असू नये, असे आवाहन ईद ए मिलाद कमिटीतर्फे करण्यात आले.
पैगंबर जयंती इस्लामिक तत्त्वांनुसारच साजरी व्हावी, अशी अपेक्षा कमिटीने व्यक्त केली. कमिटी व मुस्लिम समाजाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही भूमिका घेण्यात आली, असे उबेद शेख म्हणाले.

तख्ती दरवाजा मशिदीत करीम हुंडेकरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला कमिटीचे इलियास शेख, हाजी मोहंमद, शेख महंमद उमर यांच्यासह मुक्तार मोहंमद कुरेशी, सादिक शेख, शरीफ खान यांच्यासह शहरातील विविध मशिदींचे इमाम उपस्थित होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रत्येक मशिदीतून जुम्याच्या नमाजातून आवाहन करण्यात आले आहे. तसेच मोहल्ल्यांत बैठका घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे पैगंबर जयंतीची मिरवणूक पारंपरिक मार्गाने निघणार आहे. दुपारचा नमाज जामा मशिदीत होणार आहे. दुपारची मिरवणूक तख्ती दरवाजा मशीद, विवेकानंद पुतळा, दाबोटी चिरामार्गे जामा मशिदीत येईल. तेथून न्यायालयाच्या पाठीमागून पटवर्धन चौक, लक्ष्मीबाई कारंजा, चितळे रस्ता, जिल्हा वाचनालय, जुनी चित्रा टॉकिज, लक्ष्मी कारंजा, समाचार प्रेसमार्गे तख्ती दरवाजा येथे मिरवणुकीचे विसर्जन होईल.